मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेल्या विवादित फोन टॅपिंगच्या अहवालाप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत. त्यामुळेच हा अहवाल फोडल्याचा आरोप ते माझ्यावर करत आहेत अशी टीका अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
रश्मी शुक्ला यांनी तयार केलेल्या फोन टॅपिंगच्या अहवालाचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप करत होते. राज्यात पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात एक रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र पोलिसांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र कमिटी असते. त्या कमिटीच्या शिफारसीनुसार बदल्या होत असतात. रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालानुसार त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच नाही. हे सत्य समोर आले असून यात गुन्हा नोंद झाल्याने देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत. त्यामुळे ते असे बेछूट आरोप करत आहेत असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल