महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Charge Sheet Against Amit Bhosle: उद्योगपती अविनाश भोसलेंच्या मुलाविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल - Charge sheet against son of Avinash Bhosle

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले त्यांचा मुलगा अमित भोसले आणि इतर दोघांविरुद्ध सुरू असलेल्या जमीन घोटाळ्या प्रकरणात आज 7000 पानांचे आरोपपत्र अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये दाखल केले आहे.( Industrialist Avinash Bhosale ) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाशी संबंधित 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती तर या मालमत्तेचा बाजार दर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता.

उद्योगपती अविनाश भोसलेंच्या मुलाविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल
उद्योगपती अविनाश भोसलेंच्या मुलाविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

By

Published : Aug 4, 2022, 10:30 PM IST

मुंबई -प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात ईडीने आरोप पत्र दाखल केली आहे. ARA प्रॉपर्टीज आणि इतर दोन जमिनींच्या प्रकरणात ही आरोप पत्र ईडीने दाखल केली आहे. ( Charge sheet against son of Avinash Bhosle ) अविनाश भोसले यांचं ABIL हे मुख्यालय सरकारी आणि कमिशन ऑफिसर्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती.

एआरए मालमत्तांमध्ये हस्तांतरित केला - ईडीने 2016 मध्ये पुण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे भोसले यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआरनुसार पुण्यातील भूखंड रणजित मोहिते यांनी एआरए मालमत्तांमध्ये हस्तांतरित केला होता ज्याने जमीन केवळ सरकारला हस्तांतरित केली जाऊ शकते अशा अटींचे उल्लंघन केले.

गेल्या वर्षी जून महिन्यात 40 कोटींची मालमत्ताही जप्त - या प्रकरणी भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडीने अनेकवेळा चौकशी केली होती. आता अमित भोसले यांच्यावर पीएमएलए प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा 2002 च्या कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. येस बँक-डीएचएफएल प्रकरणात सीबीआय आणि ईडीने अटक केल्यानंतर अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भोसले आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध ईडीने आणखी एक फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन अॅक्ट कारवाई सुरू केली आहे. एजन्सीने फेमा प्रकरणात गेल्या वर्षी जून महिन्यात 40 कोटींची मालमत्ताही जप्त केली होती.




येस बँक-DHFL घोटाळा नक्की प्रकरण काय आहे? -येस बँक DHFL ची केस मार्च 2020 मध्ये CBI ने नोंदवली होती. त्यानंतर सीबीआय आणि ED ने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि DHFL चे तत्कालीन प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणी राणा कपूर आणि कपिल वाधवन यांना अटक करण्यात आली होती. सीबीआय तपास सुरू करणार होती पण तोपर्यंत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन जाहीर झाला. ईडीने २०२० मध्ये रेडियस ग्रुपच्या संजय छाब्रियांसह येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने नंतर जून २०२० पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि राणा कपूर तसेच इतरांना ताब्यात घेतले.



या प्रकरणात अविनाश भोसलेंचा काय रोल? -या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना मे महिन्यात अटक केली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात सीबीआयने या प्रकरणी भोसले शाहिद बलवा आणि इतरांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले होते. अविनाश भोसले यांनी येस बँकेकडून डीएचएफएलला कोट्यवधींचे कर्ज देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यात त्यांना कमिशन स्वरुपात काही रक्कम मिळणार होती असा आरोप भोसलेंवरती आहे.

डीएचएफएलकडून सुमारे 69 कोटी रुपये घेतल्याचा आरोप - संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या एव्हेन्यू 54, वन महालक्ष्मी या तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये भोसलेंच्या कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे 69 कोटी रुपये घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता. वरील दोन्ही प्रकल्प हे संजय छाब्रिया आणि सहाना समुहाचे बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक सुधाकर शेट्टी वरळीमध्ये करणार होते.

आर्थिक मूल्यांकन यांचा समावेश - सीबीआयच्या तपासानुसार, एक करार झाला होता ज्या अंतर्गत भोसलेच्या कंपन्यांनी काही विशिष्ट सेवा पुरवायच्या होत्या, ज्यात आर्किटेक्चरल आणि इंजिनीअरिंग डिझाइन सल्लागार, बांधकाम सल्लागार, प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज लावण्यासाठी सल्लागार, प्रकल्प बांधकाम आणि करार सल्लागार आणि आर्थिक मूल्यांकन यांचा समावेश होता. परंतु तपासाअंती सीबीआय अधिकार्‍यांना असे आढळून आले की अशा कोणत्याही सेवा पुरविल्या गेल्या नाहीत. उलट कोणतेही काम किंवा सेवा न देता संपूर्ण रक्कम भोसलेंनी घेतली.

सीबीआयने नवीन चार्टशिट दाखल - भोसलेंनी कोणतेच काम केले नाही मग रक्कम त्यांना कशी दिली गेली याचा तपास सीबीआयने पुढे सुरु केला, दरम्यान, तपासाअंती ED ने अविनाश भोसलेला 28 जून रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना नऊ दिवस ईडी कोठडीत पाठवण्यात आले, नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता सीबीआयने नवीन चार्टशिट दाखल केली आहे, यामध्ये त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा -Shinde Government: ठाकरे सरकारचे निर्णय रद्द का केले?, शिंदे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाने निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details