मुंबई -भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विद्या चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत मोहित कंबोज असतील किंवा तुमचा तो किरीट सोमय्या असेल यांना गुजरातमध्ये पाठवून द्या. त्यांचे महाराष्ट्रात काही काम नाही अस चव्हाण म्हणाल्या आहेत.
मोदी सरकार काही करू शकते हे आम्हाला कळले आहे कंबोज यांनी गुजरातमध्ये जावे इथे चौकशा करू नयेत, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचे व्यापार आहेत. लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत त्यांची चौकशी करावी. आम्ही महाराष्ट्राचे लोक आहोत आमचे आम्ही बगू असही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, अगदी ईडीही माझ्यापर्यंत चौकशी करायला लावली तरी माझे काही म्हणणे नाही. कारण अत्यंत प्रामाणिक लोकांच्या चौकशी लागणे आणि गुन्हेगारांना तिकडे बसून मंत्रीपद देणे हे मोदी सरकारचे काम आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आता बिलकिश बानूच्या 11 बलात्कारांना सोडले. त्यामुळे मोदी सरकार काही करू शकते हे आम्हाला कळले आहे असही त्या म्हणाल्या आहेत.
काय आहे प्रकरण - काही दिवसांपासून भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याची चौकशी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी माजी आमदार आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना ट्विटरवर विद्याताई जय श्रीराम असे म्हणत डिवचले आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.