मुंबई-मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने एक कविता फेसबुकवरुन शेअर केली ( Controversial post against Sharad Pawar ) आहे. त्यानंतर तिच्या विरोधात कळवा येथील पोलीस स्टेशनमध्ये ( Kalwa Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला ( Crime Against Actress Ketaki Chitale ) आहे.
अखेर गुन्हा दाखल :अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट केलेल्या कवितेनंतर तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेसबुकवर केतकीनं केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, तिच्या पोस्टवरील कमेंटमध्ये नवा वाद सुरु झालाय. याआधीही केतकी चितळेने छत्रपती शिवरायांवरही केलेली पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर पुन्हा एका बऱ्याच दिवसानंतर केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनं वाद उफाळून आलाय. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.