महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शारीरिक संबंध ठेवताना 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील हॉटेलमधील घटना - सेक्स करताना वृद्ध व्यक्ती चा मृत्यू

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीचा ( Old man died during sex at hotel in Kurla ) महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू झाल्याची घटना काल 23 मे, सोमवारी रोजी घडली. शारीरिक संबंध ठेवताना बेशुद्ध पडल्यानंतर व्यक्तीला ( Old man died during sex in Kurla in Mumbai ) रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी या मृत घोषित करण्यात आले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 24, 2022, 7:03 AM IST

मुंबई -कुर्ल्यातील हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीचा ( Old man died during sex at hotel in Kurla ) महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू झाल्याची घटना काल 23 मे, सोमवारी रोजी घडली. शारीरिक संबंध ठेवताना बेशुद्ध पडल्यानंतर व्यक्तीला ( Old man died during sex in Kurla in Mumbai ) रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी या मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा -सोने, चांदीच्या दरांमध्ये किंचित वाढ.. बिटकॉइनची घसरण सुरूच, रुपयाचाही किंमत घसरली..

कुर्ला पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 60 वर्षीय व्यक्ती आणि 40 वर्षीय महिला काल सकाळी दहाच्या सुमारास कुरल्यातील हॉटेलमध्ये आले. हॉटेलकडून रूम देण्यात आल्यानंतर ते रूममध्ये गेले त्यानंतर काही वेळाने रूममधून माझे प्रियकर बेशुद्ध पडले आहेत, असा फोन आला. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रूममध्ये गेले असता त्यांना व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसली. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. वृद्ध व्यक्तीला सायन येथील नागरी रुग्णालयाला नेण्यात आले, जेथे तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

त्यानंतर कुर्ला पोलिसांकडून महिलेला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. चौकशी दरम्यान मृत माणूस वरळी येथील रहिवासी आहे आणि एका खासगी कंपनीत काम करतो. शारीरिक संबंधादरम्यान त्याने दारू पिण्याचा प्रयत्न केला, परंतु बेशुद्ध पडला, असे महिलेने पोलिसांना जबाबात सांगितले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. कुर्ला पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि कृती करण्यापूर्वी त्याने कोणती टॅब्लेट घेतली होती की नाही, हे शोधण्यासाठी ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली.

हेही वाचा -Mumbai First Women BEST Driver : रिक्षा चालक ते बेस्ट बस ड्रायव्हर, लक्ष्मी जाधव ठरल्या पहिल्या महिला 'बेस्ट' ड्रायव्हर`

ABOUT THE AUTHOR

...view details