महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हनी ट्रॅपद्वारे घोड्यांचा प्रशिक्षक जाळ्यात; 1 लाख 23 हजार रुपयांना गंडा - मुंबई गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये सेक्सटाॅर्शन तक्रार

मुंबईमधील 54 वर्षीय व्यक्तीला हनी ट्रॅपद्वारे तब्बल 1 लाख 23 हजार रुपयांना लुटले. ( Robbery of civilians by sextortion racket ) अगोदर फेसबुकद्वारे ओळख निर्माण केली. मग मोबाईल नंबर घेतल्यावर व्हाॅट्सअॅपद्वारे ओळख केल्यानंतर व्हिडीओ काॅल करून न्यूड व्हिडीओ अपलोड करण्याची भीती दाखवून लुटले. अशाप्रकारे एक वेगळा लुटण्याचा ट्रेंड आला आहे. ( Robbed for fear of nude video uploads)

Sextortion complaint in Mumbai Gavdevi Police Station
मुंबई गावदेवी पोलिस्टेशमध्ये सेक्सटाॅर्शन तक्रार

By

Published : May 19, 2022, 10:32 AM IST

Updated : May 19, 2022, 7:00 PM IST

मुंबई : मुंबईतील एका 54 वर्षीय घोड्यांच्या प्रशिक्षकाला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी (Threatening to make nude videos viral) देत ब्लॅकमेल करीत 1 लाख 23 हजार रुपयाने लुटले असल्याची तक्रार गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये ( Gavdevi Police Station ) देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गावदेवी पोलिसांकडून करण्यात येत आहे. ( Sextortion complaint to Mumbai Police )

हनी ट्रॅपद्वारे कसे लुटतात : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय तक्रारदार, घोड्यांचे प्रशिक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या फेसबुकवर कोमल शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंडरिक्वेस्ट आली. तक्रारदार यांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर तिने फेसबुक मेसेंजरवरून तक्रारदार यांच्याशी चॅट सुरू केले. पुढे तिने तक्रारदार यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर घेत व्हाॅट्सअ‍ॅप चॅट सुरू केले. ( Upload nude videos by mobile )

गोड बोलून अश्लील चाळे करण्यास भाग पाडले : रात्रीच्या वेळी तिने व्हाॅट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल केला. यावेळी ती नग्न अवस्थेत होती. तिने तक्रारदार यांनाही कपडे काढण्यास भाग पाडले. काही वेळेचा व्हाॅट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल झाल्यानंतर तक्रारदार यांना व्हाॅट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. व्हिडीओ कॉल रेकार्ड केला असल्याचे सांगत हा व्हिडीओ फेसबुक, यु-ट्युबवर अपलोड न करण्यासाठी 31 हजार 700 रुपयांची मागणी केली.

पैसे पाठविण्यास नकार -तक्रारदार यांनी पैसे पाठविण्यास नकार देत तो नंबर ब्लॉक केला. नंतर अनोळखी नंबरवरून आलेले कॉल त्यांनी उचलले नाही. त्यानंतर आयपीएस ऑफिसर राकेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तक्रारदार यांना कॉल करून तक्रारदार यांचा एक व्हिडीओ यु-ट्युबर अपलोड झाला असून, त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले. व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याने एका क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

बनावट पोलिस असल्याचे भासवून लुटले : तक्रारदार यांनी या क्रमांकावर कॉल केला असता यु-ट्युब येथून संजय सिंग बोलत असल्याचे सांगितले. त्याने यु-ट्युबवरील व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी घाबरून ही रक्कम पाठविली. पैसे पाठविल्यानंतर तक्रारदार यांनी व्हिडीओ डिलीट केला का, अशी विचारणा केली असता त्याने आणखी एक व्हिडीओ असून, तो डिलीट करण्यासाठी अजून 21 हजार 500 रुपये उकळले.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार : पुढे तक्रारदार यांच्या विरोधात दाखल असलेला एफआयआर दाखल रद्द करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. एफआयआर दाखल झाल्याचे ऐकून तक्रारदार घाबरले. त्यांनी 80 हजार रुपये पाठवले. त्यानंतर राकेश अग्रवाल यांच्याबाबत गुगलवर माहिती पाहिली असता ते पंजाब पोलिसचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे समजले. त्यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर तक्रारदाराने गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली आहे आतापर्यंत तक्रारदाराकडून सेक्सॉर्टशन रॅकेटच्या माध्यमातून 01 लाख 23 हजार रुपये उकळण्यात आल्याची तक्रार दिली आहे.




हेही वाचा : Police Playing Flute Mumbai :...अन् खाकीतील सुप्त कलाकाराने बासरीच्या सुरांनी केले मंत्रमुग्ध, एकदा ऐकाच...!

Last Updated : May 19, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details