मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1 हजार 94 रुग्ण आढळून आले होते. आज 11 नोव्हेंबरला त्यात किंचित घट होऊन 997 रुग्ण (Corona Update) आढळून आले आहेत. आज 28 मृत्यूंची नोंद झाली आहे तर 1 हजार 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
12 हजार 352 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 997 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 21 हजार 420 वर पोहोचला आहे. तर आज 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 475 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 64 हजार 948 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 36 लाख 30 हजार 632 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.41 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 10 हजार 264 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 12 हजार 352 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 11 ऑक्टोबरला 1 हजार 736, 14 ऑक्टोबरला 2 हजार 384, 15 ऑक्टोबरला 2 हजार 149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1 हजार 78, 3 नोव्हेंबरला 1 हजार 193, 4 नोव्हेंबरला 1 हजार 141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1 हजार 94, 11 नोव्हेंबरला 997 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28 मृत्यूंची नोंद झाली आहे.