मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच, रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 ते 2 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751 रुग्ण आढळून आले होते. आज 9 नोव्हेंबरला त्यात वाढ होऊन 982 रुग्ण आढळून आले आहेत. आज 27 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, 1293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.62 टक्के तर, मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा -मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरण : परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करा, मुंबई पोलिसांची न्यायालयात मागणी
13,311 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 982 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 19 हजार 329 वर पोहोचला. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 33 लाख 99 हजार 355 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.44 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 33 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 311 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबरला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 274
अहमदनगर - 82
पुणे - 93
पुणे पालिका - 113
हेही वाचा -सचिन वाझेचा ताबा ईडीला द्यायला न्यायालयाचा नकार