मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर याच परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ( Results of Mumbai Municipal Corporation 10th School ) ९७.१० टक्के लागला आहे. २०२० च्या तुलनेत पालिका शाळांचा निकाल ३.८५ टक्क्यांनी वाढला आहे.
पालिका शाळांचा ९७.१० टक्के निकाल :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित अशा एकूण २४३ माध्यमिक शाळांमधून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेकरिता बसलेल्या १६ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ९७.१० टक्के लागला आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने गेले दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यानंतर यावर्षी शाळा सुरु झाल्या आहेत.