मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९६.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला ३६१ दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा सध्या धरणात जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवायला आणखी ५७,०८९ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज 96.06 percent rise in water stock at seven dams in mumbai आहे.
धरणांमध्ये ९६.०६ टक्के पाणीसाठा - मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. आज ( १७ ऑगस्ट) सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १३,९०,२७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ९६.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या धरणात ३६१ दिवसांचा पाणी साठा आहे.
५७,०८९ दशलक्ष लिटर पाण्याची गरज -मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरणांमध्ये १३,९०,२७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा ९६.०६ टक्के पाणीसाठा आहे. पालिकेची सातही धरणे भरण्यासाठी आत केवळ ५७,०८९ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. आतापर्यंत मोडक सागर, तानसा आणि तुळशी ही तीन धरणे भरून वाहू लागली आहे. सध्या ३६१ दिवस पुरेल इतका पाणी आहे. ऑगस्ट महिना सुरु आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडेल. यामुळे धरणे भरतील अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.