मुंबई- गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधारचा पावसांचा जोरदार फटका कोकणासह नऊ जिल्ह्यांना बसला आहे. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून 76 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत प्रशासनाकडून शनिवारी सकाळी 10 पर्यंत पुरात अडकलेल्या सुमारे 90 हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मदत व पुनर्वसन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कोकणासह अतिवृष्टीबाधित भागातून 90 हजार लोकांना जीवदान, 890 गावांना फटका - अतिवृष्टीचा फटका
गेले दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याची दाणादाण उडवली. कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे नऊ जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. 890 गावे बाधित झाली आहेत. एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने येथे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. बचावकार्याला सुरुवात झाल्यापासून शनिवारी सकाळी 90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.
90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले-
गेले दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याची दाणादाण उडवली. कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे नऊ जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. 890 गावे बाधित झाली आहेत. एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने येथे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. बचावकार्याला सुरुवात झाल्यापासून शनिवारी सकाळी 90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. तर आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू असून 38 जण जखमी झाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली.
५ तुकड्या बचावासाठी उतरल्या
एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या बचावासाठी उतरल्या आहेत. मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ मध्ये आहेत. भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्यापैकी कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातीत तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव ठेवल्या आहेत. तटरक्षक दलाच्या ३, नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे आहेत. तर एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या कार्यरत आहेत.
महाड येथील परिस्थिती
अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला. सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले. तर एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटना स्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरू केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरू करण्यात आल्याचे मदत व पुनर्विकास विभागाने सांगितले.
२ कोटी रुपये निधी
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाऊस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे. सुमारे १००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
एकूण बाधित गावे - ८९०
एकूण मृत्यू - ७६
हरविलेल्या व्यक्ती - ५९
जखमी व्यक्ती - ३८
पूर्ण नुकसान झालेली घरे - १६
अंशतः नुकसान झालेली घरे - ६
प्राण्यांचे मृत्यू - ७५
सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती - ९० हजार
मदत छावण्या - ४
निवारा केंद्रे - रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)
सुविधांचे नुकसान - चिपळूण येथे वाशिष्ठी नदीवरील पूल खचला
बोटी - ५९ (४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)