मुंबई -मुंबईच्या रस्तांवरती पुन्हा एकदा डबल डेकर बेस्ट बसेस धावताना दिसणार ( Mumbai Best Double Decker Buses ) आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली ( Aditya Thackeray Announced Double Decker Bus )आहे. मुंबईसाठी 900 इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस 12 वर्षासाठी वेट लीजवर खरेदी करायला बेस्टने मंजूरी दिली ( Best 900 Double Decker Buses Buy ) आहे. यासाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले ( Aditya Thackeray Tweet ) की, "डबल डेकर बस यापुढे इलेक्ट्रिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी मुंबईच्या प्रतिष्ठित डबल डेकर बसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच, आम्ही जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणणार आहोत."