मुंबई -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आज राज्यात केवळ ९ हजार ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, अवघे ६६ रुग्ण दगावले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही २५ हजार १२५ इतकी, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. ओमायक्रोनचा मात्र गेल्या तीन दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -'या' संगीतकाराने लता मंगेशकरबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती, तेव्हा....
आज राज्यात ९ हजार ६६६ नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ३ हजार ७०० झाली आहे. यापैकी २ हजार २३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण ७ हजार १४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असनू त्यापैकी ६ हजार ८५५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहते. १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहते. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १८ हजार ७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.