महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ED Interrogation Mumbai : छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटची ईडीकडून 9 तास चौकशी, आजही होणार चौकशी - ED action on Salim Fruit

ईडी आणि NIA संयुक्त कारवाई आज मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Underworld don Dawood Ibrahim ) याच्या निकटवर्तीय तसेच दाऊद संबंधित व्यक्तींवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी 10 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मुंबईत 9 तर ठाण्यात 1 ठिकाणे सर्च ऑपरेशन करण्यात आले. गँगस्टर छोटा शकीलचा ( gangster Chhota Shakeel ) मेव्हणा सलीम फ्रुट याला ईडीने चौकशी करण्याकरीता ताब्यात घेतले होते. 9 तास चौकशीनंतर सलीम फ्रुट याला सोडून देण्यात आले असून उद्या पुन्हा चौकशीला बोलवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ED Interrogation Mumbai
सलीम फ्रुट

By

Published : Feb 16, 2022, 1:20 AM IST

Updated : Feb 16, 2022, 11:15 AM IST

मुंबई -ईडी आणि NIA संयुक्त कारवाई आज मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Underworld don Dawood Ibrahim ) याच्या निकटवर्तीय तसेच दाऊद संबंधित व्यक्तींवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी 10 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मुंबईत 9 तर ठाण्यात 1 ठिकाणे सर्च ऑपरेशन करण्यात आले. गँगस्टर छोटा शकीलचा ( gangster Chhota Shakeel ) मेव्हणा सलीम फ्रुट याला ईडीने चौकशी करण्याकरीता ताब्यात घेतले होते. 9 तास चौकशीनंतर सलीम फ्रुट याला सोडून देण्यात आले असून उद्या पुन्हा चौकशीला बोलवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आजही (दि १६ फे.) त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याची आजही पुन्हा चौकशी होत आहे.

17 देशात फिरला -

मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडी ही छापेमारी केली आहे. याबाबत अजूनपर्यंत ईडीचे अधिकृत वक्तव्य आले नाहीये. पण याप्रकरणात ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट याची 9 तास चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास 17 ते 18 देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते.

चौकशीनंतर सोडून दिले -

आज दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हसीना पारकरच्या घरी तब्बल 4 तास ईडीने छापेमारी केली त्यानंतर आता ईडी पारकरच्या घराबाहेरून निघाली आहे. गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट ईडीने चौकशी करण्याकरीता ताब्यात घेतले आहे. सलीम फ्रुट याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे देखील दाखल आहे. खंडणी, खून यासारखे अनेक गुन्हे सलीम फ्रूटवर दाखल असून गेल्या कित्येक दिवसापासून त्याला एका प्रकरणात तडीपार देखील करण्यात आले होते.

हेही वाचा -SSC HSC Exams : दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी यंदा 'असे' आहे विशेष नियोजन : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Last Updated : Feb 16, 2022, 11:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details