मुंबई- मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. सोमवारी 676 रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन आज 866 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून 1045 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 511 दिवसांवर पोहोचला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 511 दिवस
मुंबईत आज 866 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 10 हजार 807 वर पोहोचला आहे. आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 018 वर पोहोचला आहे. 1045 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 77 हजार 445 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 16 हजार 133 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 511 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 27 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 116 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 669 तर आतापर्यंत एकूण 63 लाख 98 हजार 665 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच
1 मे रोजी 3908, 2 मे रोजी 3672, 3 मे रोजी 2662, 4 मे रोजी 2554, 5 मे रोजी 3879, 6 मे रोजी 3056, 7 मे रोजी 3039, 8 मे रोजी 2678, 9 मे रोजी 2403, 10 मे रोजी 1794, 11 मे रोजी 1717, 12 मे रोजी 2116, 13 मे रोजी 1946, 14 मे रोजी 1657, 15 मे रोजी 1447, 16 मे रोजी 1544, 17 मे रोजी 1240, 18 मे रोजी 953, 19 मे रोजी 1350, 20 मे रोजी 1425, 21 मे रोजी 1416, 22 मे रोजी 1299, 23 मे रोजी 1431, 24 मे रोजी 1057, 25 मे रोजी 1037, 26 मे रोजी 1362, 27 मे रोजी 1266, 28 मे रोजी 929, 29 मे रोजी 1048, 30 मे रोजी 1066, 31 मे रोजी 676, 1 जून रोजी 831, 2 जून रोजी 925, 3 जून रोजी 961, 4 जून रोजी 973, 5 जून रोजी 866 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -मराठा आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आमदार मेटेंचा इशारा