मुंबई - राज्यातील नगपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार ( Maharashtra Nagarpanchayat And Zilla Parishad Election ) पडले. त्यानुसार, 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी सरासरी 81, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ( Maharashtra Election Commission ) 21 डिसेंबर 2021 रोजी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला. त्यानुसार, राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद ( Bhandara Gondia Zilla Parishad Election ) आणि त्यामधील 15 पंचायत समित्या आणि चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.