मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आज 1 नोव्हेंबरला 809 रुग्णांची नोंद झाली आहे. 10 मृत्यूंची नोंद झाली असून 1 हजार 901 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.59 टक्के तर, मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा -अनिल देशमुख आले स्वतःच्या गाडीने मात्र जाणार ईडीच्या कस्टडीत - किरीट सोमैया
15,552 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 809 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे, यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 11 हजार 887 वर पोहोचला आहे. तर, आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 226 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 901 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 52 हजार 486 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.59 टक्के तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 27 लाख 52 हजार 687 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.54 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 60 हजार 462 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 15 हजार 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.