महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीएसएमटी रेल्वे स्थानकांवरून 80 हजारांचा 8 किलो गांजा जप्त - सीएसएमटी रेल्वे स्थानकांत गांजा जप्त

सीएसएमटी रेल्वे स्थानकांवरून 80 हजारांचा 8 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पाेलीस ठाण्यात दाेघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 27, 2021, 10:39 PM IST

मुंबई- मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरक्षा विभागाकडून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची तपासणी करत असताना दोन संशंयित व्यक्ती गांजाची तस्करी करताना आढळून आले आहेत. त्यानंतर या दोघांना पकडून त्यांच्याकडून 80 हजार रुपयांचा 8 किलोचा गांजा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पळून जाण्याचा केला प्रयत्न-
मिळालेल्या माहितीनुसार, लोह मार्ग पोलीस आणि आरपीएफने मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तपासणी केली. यादरम्यान फलाट क्रमांक १८जवळील व्हेईकल स्कॅनर मशीनच्या बिट पॉईंट जवळ दाेन ईसम दाेन बॅगा घेउन संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पाेलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत उडवाउडविची उत्तरे दिली.त्यानंतर पाेलीस निरिक्षण भगवान डांगे आणि आरपीएफचे खान यांनी त्या दाेघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली.

८ किलाे गांजा केला जप्‍त-
पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याचे नावे विचारल्यावर एकाने माेहम्मद हासीम नदाफ (60) बिहार आणि शंकर ईश्वर मुरारी (55) कलकत्ता असे सांगितले. हे दाेघे सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर फुटपाथवर रहात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील दाेन बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये ८० हजार रुपये किंमतीचा ८ किलाे गांजा सापडला. सीएसएमटी रेल्वे पाेलीस ठाण्यात दाेघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणि काेणाला विकण्यासाठी आणला, याची चाैकशी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details