मुंबई - माजी महापौर व 80 वर्षीय कट्टर शिवसैनिक महादेव देवळे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दीर्घकाळानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) मधून आज त्यांना घरी सोडण्यात आले. तेव्हा कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचा हा त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
आशादायक; 80 वर्षीय शिवसेनेच्या माजी महापौरांची कोरोनावर मात
कर्करोगातून वाचलेल्या आणि सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महादेव देवळे यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. सतत झोप येणे, सुस्तपणा येणे व मानसिक संभ्रम वाटणे ही प्राथमिक लक्षणे असलेल्या देवळे यांना प्रत्यक्षात कोरोनाची लागण होऊन त्यात गुंतागुंत निर्माण झाली होती.
यापूर्वी कर्करोगातून वाचलेल्या आणि सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महादेव देवळे यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. सतत झोप येणे, सुस्तपणा येणे व मानसिक संभ्रम वाटणे ही प्राथमिक लक्षणे असलेल्या देवळे यांना प्रत्यक्षात कोरोनाची लागण होऊन त्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. त्याचा परिणाम त्यांची फुफ्फुसे, मेंदू व हृदय व इतर अवयवांवर झाला होता. देवळे यांच्यावर कोरोनाचे विविध स्वरुपाचे, तसेच स्ट्रोक, हृदयविकार यांचे उपचार करून ‘न्यूरो-रिहॅबिलिटेशन’ केल्याने त्यांच्या प्रकृतीत यशस्वी सुधारणा झाली. त्यांच्या रुग्णालयातील 20 दिवसांच्या मुक्कामात व्हेंटिलेटर आणि इतर प्रगत स्वरुपाचे उपचार करण्यात आले. त्यातून बरे होण्याची प्रगती ही इतर रुग्णांना प्रेरणादायी ठरली आहे.
जुलैच्या मध्यातच महादेव देवळे यांना थोडा खोकला आणि उच्च रक्तदाब या त्रासांवरील उपचारांसाठी अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याचे तपासणीत आढळले. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली गेली, ती अतिशय कमी होती. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
रुग्णाला दाखल करून घेताना असे दिसून आले, की केवळ त्याच्या फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदयावरही परिणाम झाला आहे. रुग्ण काही काळ कोमात गेला. नंतर तो अर्धवट अवस्थेतच शुद्धीवर आला आणि गोंधळून गेला. त्याच्या कमजोर आरोग्यामुळे आणि आजाराच्या तीव्रतेमुळे, जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत त्यांंच्यावर एमआरआय करणे शक्य नव्हते. शेवटी जेव्हा आम्ही एमआरआय करू शकलो, तेव्हा अनेक लहान स्वरुपाचे स्ट्रोक्स आल्याचे आढळले. सार्स-कोव्ह-2 विषाणूचा मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊ शकतो, हे यातून पुन्हा उघड झाले अशी माहिती रुग्णालयातील यूरोसायन्स केंद्रातील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ.अन्नू अग्रवाल यांनी दिली.