महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

st workers salary deduction - ८० हजार एसटी कामगारांना संपामुळे वेतन कपातीचा फटका - एसटी कर्मचारी वेतन कपात

गेल्या महिन्याभरापासून एसटी संपात सहभागी असणाऱ्या तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा ( st workers salary deduction ) फटका बसला आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन महिन्याच्या सात तारखेला अर्थात कालपासून जमा केले आहे.

st workers salary deduction
एसटी

By

Published : Dec 8, 2021, 3:41 PM IST

मुंबई -गेल्या महिन्याभरापासून एसटी संपात सहभागी असणाऱ्या तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा ( st workers salary deduction ) फटका बसला आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन महिन्याच्या सात तारखेला अर्थात कालपासून जमा केले आहे. त्यानुसार, संपात सामील नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले असून ८० हजार कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा -Nagaland killings: 'राजाने मारले तर जनता न्याय करते', नागालँडच्या घटनेवर सामनातून प्रहार

दहा हजारांहून अधिक कामगारांना सुधारित वेतन

गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. मात्र, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून मोठी वेतनवाढीचा आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारपासून एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामांवर हजर राहिले आहेत, त्याच कर्मचार्‍यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाने १०० टक्के कामगारांचे वेतन ७ तारखेला केल्याचा दावा केला आहे. त्यानुसार, संपात सामील नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले असून ८० हजार कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. सरासरी ८० हजारांहून अधिक कामगारांना पहिल्या आठवड्यातील हजेरीसाठी सुधारित वेतनवाढीचा लाभ मिळाला आहे. याउलट मोठ्या संख्येने संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीसह १०० टक्के पगार जमा झाला आहे.

२० हजारांहून अधिक कामगारांना वेतन नाही

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील सुमारे २० हजार कामगार हे ऑक्टोबर महिन्यापासूनच संपावर असल्याने त्यांना वेतनवाढ मंजूर झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यातील शून्य उपस्थितीमुळे त्यांच्या खात्यावर शून्य पगार जमा झालेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वच एसटी कामगारांना मिळणारी पगारातील तफावत त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.

कामगारांना आव्हान

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, एसटीच्या संपाला न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहे. वारंवार आम्ही कामगारांना कर्तव्यावर हजर होण्याचे आव्हान करत आहे. या शिवाय महामंडळाने दिलेल्या आश्वासनानुसार, सात तारखेलाच सर्व कामगारांचे वेतन अदा केले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केलेल्या वेतन वाढीच्या घोषणेप्रमाणेच सर्व कामगारांचे वेतन झालेले आहे. सुमारे १० हजारांहून अधिक कर्मचारी हे संपूर्ण महिनाभर कामावर हजर होते. त्यांना १०० टक्के वेतन हे सुधारित वेतनवाढीनुसार मिळाले आहे.

हेही वाचा -शेतकऱ्यांना कृषिमाल निर्यातीचे तंत्र शिकवणार - कृषी मंत्री दादा भुसे

ABOUT THE AUTHOR

...view details