मुंबई -विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session 2021 ) पार्श्वभूमीवर विधानभवनात ( Vidhan Bhavan ) प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत ८ जणांची चाचणी पॉझिटिव्ही ( 8 People Tested Positive for RT-PCR ) आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी ( Vidhan Bhavan Entrance ) बंधनकारक करण्यात आली असून अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बुधवारी २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन ( Winter Session 2021 ) प्रवेशासाठी खबरदारी म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदारांची आरटी पीसीआर चाचणी ( Journalist, Officer And MLA RT-PCR Teste ) करण्यात आली. एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
- 'ओमायक्रॉनचा धोका पाहता उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा'
अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी दिल्या आहेत.
- अभ्यागतांना प्रवेश नाही