महाराष्ट्र

maharashtra

७७ वर्षीय महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण; घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Sep 20, 2021, 3:53 PM IST

Updated : Sep 20, 2021, 4:35 PM IST

ट्रेन क्रमांक ०७२०३ भावनगर काकीनाडा पोर्ट विशेष एक्स्प्रेस वसई स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर आली होती. भावनगर काकीनाडा पोर्ट विशेष गाडी आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. यादरम्यान गाडीचा वेग वाढत असताना एक वृद्ध महिला प्रवासी आपल्या पतीबरोबर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ट्रेनमध्ये चढत असताना वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला.

वसई रेल्वे घटना
वसई रेल्वे घटना

मुंबई -धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण रेल्वे पोलीस व इतर प्रवाशांनी वाचवले. ही घटना वसई रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेत ७७ वर्षी आजी गंभीर जखमी झाली असून लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांच्या मदतीने आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

७७ वर्षीय महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण



अशी घडली घटना

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी(18) सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांचा सुमारास ट्रेन क्रमांक ०७२०३ भावनगर काकीनाडा पोर्ट विशेष एक्स्प्रेस वसई स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर आली होती. भावनगर काकीनाडा पोर्ट विशेष गाडी आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. यादरम्यान गाडीचा वेग वाढत असताना एक वृद्ध महिला प्रवासी आपल्या पतीबरोबर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ट्रेनमध्ये चढत असताना वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यांवर असलेल्या आरपीएफ काँन्स्टेबल समयसूचकता दाखवून सह प्रवाशांच्या मदतीने त्या महिला प्रवाशांला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे.

रुग्णालयात दाखल

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, सुमीत ठाकूर यांनी सांगितले की, या वृद्ध महिला प्रवासीचे नाव प्रमिला नवीनचंद्र मारो असून आपल्या पत्तीबरोबर भावनगरहून हैदराबादला जात होती. यावेळी वसई रेल्वे स्थानकात चहापानासाठी ट्रेन काही वेळ थांबली होती. त्यावेळी चहा पिण्यासाठी प्रमिला आपल्या पतीसह ट्रेनमधून उतरल्या होत्या. मात्र, लगेचच ट्रेन सुरू झाली. आपली ट्रेन सुटणार या भीतीने दोघंही प्लॅटफॉर्मवर धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण रेल्वे पोलीस व इतर प्रवाशांनी वाचवले. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना वेळेतच रवी रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या तिची प्रकृती ठीक असून तिला रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना वसई रेल्वे स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच आरपीएफ काँन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत या वृद्ध प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्या घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. आरपीएफ कॉन्स्टेबल आणि सहप्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध महिला प्रवाशाच्या जीव वाचला आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली आहे.

हेही वाचा -गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 9,000 कोटींचे हेरॉइन जप्त, गुप्तचर विभागाची सर्वात मोठी कारवाई

Last Updated : Sep 20, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details