मुंबई - गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ३७ लाख २३ हजार १९ नागरिकांवर कारवाई करत ७७ कोटी ३७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- ३७ लाख २३ हजार नागरिकांवर कारवाई -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ५७२ दिवसांत ३७ लाख २३ हजार १९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत ७७ कोटी ३७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३० लाख ६३ हजार ८८१ नागरिकांवर कारवाई करत ६४ कोटी १६ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ६ लाख ३५ हजार २४७ नागरिकांवर कारवाई करत १२ कोटी ७० लाख ४९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करा -