नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईतीला ( Mumbai and Navi Mumbai ) हाकेच्या अंतरावर जोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शिवडी ते न्हावा शेवा सागरी पुलाचे काम सुरू ( Shivdi to Nhava Sheva Sea Bridge work ) केले आहे. सध्या या कामाने गती घेतली आहे. या मार्गावर आर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सुरू आहे . या मार्गावर एकूण ३२ गाळे बसविण्यात येत असून या गाळ्यांची निर्मिती जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम व म्यानमारमध्ये करण्यात आली आहे. सागरी मार्गाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
२२ किलोमीटर लांबीच्या पुलाद्वारे जोडली जाणार दक्षिण मुंबई नवी मुंबई व पुणे- शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाणारं आहे. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाणार आहे. ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक देखील सुलभ होणार आहे . तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येणार आहे.