मुंबई -संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा राज्य परिवहन महामंडळाच्या ( MSRTC ) दहा हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत आहे. आतापर्यत तब्बल 73 सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्यापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
295 कोटी रुपये थकीत - एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 1 जून, 2018 पासून राज्यभरातील सुमारे दहा निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत होते. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत होते. मात्र, निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे परिपत्रक असतानाही निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची कोणीही ऐकत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत आहे.