महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत घट झाली होती. मात्र, आता त्याच किंचीत वाढ झाली आहे. आज कोरोनाच्या 73 रुग्णांची नोंद करण्यात आली ( Mumbai Corona Update ) आहे.

By

Published : Apr 13, 2022, 9:13 PM IST

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave Corona Virus ) आली. मात्र, आता ती आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in Corona Cases ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात आज वाढ होऊन ७३ रुग्णांची नोंद ( Mumbai Corona Cases ) झाली. तर शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

७३ नवे रुग्ण -मुंबईत आज बुधवारी ७३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( Mumbai Corona Patients Discharged ) आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार ५६७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ६७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १६५३८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ७३ रुग्णांपैकी ६८ म्हणजेच ९३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १५१ बेड्स असून, त्यापैकी १३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. यादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२, १३ एप्रिलला ७३ रुग्णांची नोंद झाली आहे.

५७ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ५७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -ED Attached Nawab Malik Properties : नबाव मलिकांची मुंबईसह उस्मानाबादमधील 148 एकर जमीन ईडीकडून जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details