महाराष्ट्र

maharashtra

Central Railway in Mumbai: मध्य रेल्वेचा ७२ तासांचा सर्वात मोठा ब्लॉक; पुढचा महिन्यात नव्या मार्गावर धावणार लोकल!

By

Published : Jan 25, 2022, 9:26 PM IST

मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान ( Megablock in Mumbai on 25th Jan 2022 ) आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांना ठाणे ते दिवा ( Thane to Diva mega block ) दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. नुकताच पार पडलेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नवीन डाऊन जलद मार्गिका सुरू केली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वे मेगा ब्लॉक
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक

मुंबई- गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांनी रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार- रविवारी मेगाब्लॉक घेऊन काम करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात मध्य रेल्वेकडून ७२ तासाचा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात ( central railway mega block in Jan 2022 ) येणार आहे.

पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधील अंतिम टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांना ठाणे ते दिवा ( Thane to Diva mega block ) दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-Girl Marriage Age : मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्ष करावे का? यासाठी महाराष्ट्रात चर्चा व्हावी - सुप्रिया सुळे

सर्वात मोठा मेगाब्लॉक -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान ( Megablock in Mumbai on 25th Jan 2022 ) आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८ साली मंजुरी मिळाली. तरीही निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१ पासून वेग धरला आहे. रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान सुमारे ९ किमी अंतराच्या दोन मार्गिकांना अंतिम स्वरूप दिले जात आहे.

हेही वाचा-Shilpa Shetty Kissing Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची 'किस' प्रकरणातून निर्दोष मुक्तता

नुकताच पार पडलेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नवीन डाऊन जलद मार्गिका सुरू केली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे. तर, पुढील ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांना ठाणे ते दिवा दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण ते एलटीटीपर्यंत स्वतंत्र मेल व एक्सप्रेसला जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-Zombivali movie release : झोम्बिवली चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग झाला मोकळा

असा असणार ७२ तासांचा ब्लॉक-
एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने ४ फेब्रुवारी रोजी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ७२ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवेच्या मार्गात बदल, अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, ४ ते ४ फेब्रुवारीच्या ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर सहावी मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका सुरू होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details