मुंबई - मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल ७२ तासाचा मेगाब्लॉक घेतला जाणार ( Thane Diva Railway Mega Block ) आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात घोषणा केली. शनिवारी मध्य रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी मध्य रात्री १२ वाजेपर्यत मेगाब्लॉक ( Mumbai Central Railway Mega block ) असेल. या काळात १७५ पेक्षा अधिक लोकल ट्रेन, ४० पेक्षा अधिक मेल एक्सप्रेसच्या गाड्या रद्द केल्या जातील. तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
असा असेल मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामांसाठी आणि दिवा येथे नवीन आरआरआय इमारत सुरू करण्यासाठी ७२ तासाचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक शनिवार, रविवार मध्यरात्री 12 ते सोमवार मंगळवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत शुक्रवारी रात्री ११.१० ते पहाटे ४ वाजेपर्यत कल्याण येथून सुटणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस आणि अप जलद उपनगरीय गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. रविवारपासून अप जलद गाड्या कळवा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि नवीन बोगदा-१ मार्गे नव्याने तयार केलेल्या जलद मार्गावर चालविण्यात येतील.
या ४३ मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द
- 22119/22120 मुंबई - करमळी - मुंबई एक्सप्रेस
- 12051/12052 मुंबई - मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
- 11085 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस
- 11086 मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्सप्रेस
- 11100 मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 22113 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली एक्सप्रेस
- 22114 कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12224 एर्नाकुलम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलम एक्सप्रेस
- 12220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद
- 12133/ 12134 मुंबई – मंगळुरू जंक्शन- मुंबई एक्सप्रेस
- 17317 हुबळी– दादर एक्सप्रेस
- 17318 दादर- हुबळी एक्सप्रेस
- 11008 पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस
- 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस
- 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस
- 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- 12071 / 12072 मुंबई- जालना -मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस
- 12109/12110 मुंबई- मनमाड -मुंबई पंचवटी एक्सप्रेस
- 11401/11402 मुंबई - आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
- 12123/12124 मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस
- 12112 अमरावती - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
- 12111 मुंबई - अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस
- 12140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
- 12139 मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
- 11139/11140 मुंबई- गदग - मुंबई एक्सप्रेस
- 17611 ह.साहिब नांदेड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
- 17612 मुंबई - ह. साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
- 12131 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
- 12132 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
- 11041 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
- 11042 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
- 11027 दादर- पंढरपूर एक्सप्रेस
- 11028 पंढरपूर - दादर एक्सप्रेस
- 22147 दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस
- 22148 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस
- 11003/11004 दादर- सावंतवाडी रोड - दादर तुतारी एक्सप्रेस
- 50103/50104 दिवा - रत्नागिरी- दिवा पॅसेंजर
- 10106 सावंतवाडी - दिवा एक्सप्रेस
- 10105 दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस
पनवेल येथे एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
- 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस
- 10112 मडगाव - मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस
- 12202 कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस
- 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
- 12620 मंगळुरु जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस
पुणे येथे एक्सप्रेस ट्रेनचे शॉर्ट टर्मिनेशन
- 17032 हैदराबाद - मुंबई एक्सप्रेस