महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai corona Update : 714 रुग्णांना डिस्चार्ज.. 608 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 608 रुग्णांची नोंद झाली असून 18 मृत्यूची नोंद झाली आहे. 714 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे.

c
c

By

Published : Jun 28, 2021, 10:02 PM IST

मुंबई -मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. आज 608 रुग्णांची नोंद झाली असून 18 मृत्यूची नोंद झाली आहे. 714 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवसांवर -

मुंबईत आज 608 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 964 वर पोहचला आहे. आज 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 414 वर पोहचला आहे. आज 714 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 94 हजार 796 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 8 हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 12 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 82 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 28 हजार 295 तर आतापर्यंत एकूण 70 लाख 72 हजार 953 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 25 जून ला 693, 26 जून ला 648, 27 जून ला 746, 28 जून ला 608 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details