मुंबई- तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 'बार्ज पी305' व टग बोट वरप्रदा या दोन ठिकाणी भारतीय नौदलात तर्फे बचाव व शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत याठिकाणी करण्यात आलेला शोधकार्या दरम्यान एकूण 71 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यांपैकी आतापर्यंत 50 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. या मृतदेहांना संबंधित नातेवाईकांकडे देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. अजूनही 21 मृतदेहाची ओळख पटली नसून त्यासाठी त्यांची डीएनए चाचणी केली जात आहे.
वरप्रदावर शोधमोहीम सुरू; अद्याप एकही मृतदेह नाही आढळला..
भारतीय नौदलाच्या विशेष ड्रायव्हर्स पथकाकडून अरबी समुद्रातील टग बोट वरप्रदा ज्याठिकाणी बुडाली होती त्या ठिकाणी शोध मोहीम घेतली जात आहे. मुंबईपासून 35 नॉटिकल माईल्स वर समुद्रात टग बोट बुडाली असून नौदलाच्या 'आयएनएस मकर' व 'आयएनएस तरासा' या दोन जहाजांकडून विशेष डायव्हर्स पथकाकडून शोध मोहीम घेण्यात येत आहे. खोल समुद्रात सुरू असलेल्या या शोध मोहिमेत आतापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आलेला नाहीये.