महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रेयसी सोडून गेल्याने प्रियकराकडून बालकाचे अपहरण करून हत्या; मृतदेह फेकला पाण्याच्या टाकीत - गोरेगाव क्राईम न्यूज

गोरेगावमधील वनराई पोलीस ठाण्याच्या (Vanrai Police Goregaon) हद्दीत 7 महिन्यांच्या निष्पाप बालकाचे अपहरण करून हत्या (7 Month Boy Murder) करण्यात आली. हत्येनंतर बालकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून पाण्याच्या टाकीत फेकण्यात आला. प्रेयसी सोडून गेल्याच्या कारणामुळे आरोपीने बालकाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

accused
अटक केलेला आरोपी

By

Published : Mar 28, 2022, 4:31 PM IST

Updated : Mar 28, 2022, 5:19 PM IST

मुंबई -गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या (Vanrai Police Station) हद्दीत एक वेदनादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 7 महिन्यांच्या निष्पाप बालकाचे अपहरण करून हत्या (7 Month Boy Murder) करण्यात आली. हत्येनंतर बालकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून पाण्याच्या टाकीत फेकण्यात आला. प्रेयसी कुटुंबासह मुंबई सोडून इतर गावी जात असल्याच्या कारणामुळे आरोपीने बालकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर घडली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

प्रेयसी सोडून गेल्याने केली हत्या : बऱ्याच प्रयत्नानंतर श्वान पथक कपड्याच्या आधारे बालकापर्यंत पोहचले. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या 10 तासांत फरार आरोपीला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनरावृत्ती केली. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. आरोपी कन्नन मुथूट गणेश स्वामी उर्फ कंटू याने वनराई पोलिसांना सांगितले की, 7 महिन्यांच्या बालकाची अपहरण करून हत्या केली, कारण त्याची प्रेयसी त्याला सोडून कुटुंबासह कायमची गावी जात होती, म्हणून तिला मुंबईत थांबवण्यासाठी एका बालकाचे अपहरण करून त्याचा खून केला.

बालकाचे अपहरण करून हत्या : तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास महिला आपल्या 7 महिन्यांच्या बाळासह पुलाखाली झोपली होती. त्यावेळी तिचे नवजात बाळ बेपत्ता झाले. शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. स्निफर डॉगने बालकाच्या जुन्या कपड्यांचा वास घेतला, त्याआधारने श्वान त्या बालकाच्या ठिकाणी पोहोचला. त्या बालकाचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत फेकण्यात आला होता. यानंतर तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Last Updated : Mar 28, 2022, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details