महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 24, 2022, 12:02 PM IST

Updated : Jan 24, 2022, 12:42 PM IST

ETV Bharat / city

Kamla building Fire Update : कमला इमारतीच्या आगीत ७ वा मृत्यू, ८ जण आजही गंभीर

गवालिया टॅंक, नाना चौक येथील कमला इमारतीला (Kamala Building Fire) २२ जानेवारीला आग लागली. या आगीत २९ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल (Kamla building Fire Update) केले असता ६ जणांचा मृत्यू झाला तर ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यामधील नायर रुग्णालयात (Nair Hospital) एकाचा मृत्यू झाला आहे.

kamla building fire update
kamla building fire update

मुंबई - गवालिया टॅंक, नाना चौक येथील कमला इमारतीला (Kamala Building Fire) २२ जानेवारीला आग लागली. या आगीत २९ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल (Kamla building Fire Update) केले असता ६ जणांचा मृत्यू झाला तर ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यामधील नायर रुग्णालयात (Nair Hospital) एकाचा मृत्यू झाला आहे. या मुळे मृतांचा आकडा ७ वर गेला आहे. या घटनेतील ८ जणांची प्रकृती आजही गंभीर आहे.

आज ७ वा मृत्यू
ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारत आहे. २० मजली असलेल्या या इमारतीत १९ व्या मजल्यावर २२ जानेवारीला सकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. या आगीवर १३ फायर इंजिन, ८ जम्बो टॅंकर द्वारे दुपारी १२.३० च्या सुमारास नियंत्रण मिळवले. आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने अग्निशमन दलाने त्यांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत २९ जणांना भाटिया, कस्तुरबा, नायर, मसीना आदी रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ६ जणांचा मृत्यू झाला होता. आज नायर रुग्णालयात सकाळी ७ वाजता मनीष सिंग वय ३८ वर्षे याचा मृत्यू झाला. या मुळे मृतांची संख्या ७ झाली आहे.

८ जण आजही गंभीर
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कस्तुरबा रुग्णालयात १, मासिना रुग्णालयात १ तर भाटिया रुग्णालयात दाखल असलेल्या १२ पैकी ६ जण अशा एकूण ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. नायर रुग्णालयात २ जण दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

चौकशी समिती नियुक्त
आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

मृतांची नावे
मीना मिस्त्री
मौसमी मिस्त्री
हितेश मिस्त्री
मंजूबेन कथारिया
पुरुषोत्तम चोपडेकर
अनोळखी मृतदेह
मनीष सिंग

हेही वाचा -Kamala Building Fire : जखमींना दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा - गिरीश महाजन

Last Updated : Jan 24, 2022, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details