मुंबई: मुंबई क्राईम ब्रँच युनिट ११ ने बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट ११ ने ७ आरोपींना अटक करून, ७ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त ( Mumbai Police Busted Fake Currency Racket ) केले.
Fake Currency Seized : मुंबईत तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त.. ७ आरोपी गजाआड, लॅपटॉप, कार पोलिसांच्या ताब्यात - 7 crore counterfeit notes seized in Mumbai
मुंबई पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमालही जप्त करण्यात आला ( Mumbai Police Busted Fake Currency Racket ) आहे.
मुंबईत तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त.. ७ आरोपी गजाआड
खऱ्या नोटांमध्ये बदलून आणायचे चलनात
पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, ७ फोन, रोख रक्कम, कार आणि सिमकार्डही जप्त केले ( Fake Currency Seized ) आहे. या बनावट नोटा मुंबईत नेऊन इतर टोळ्यांना विकल्या जायच्या. त्यानंतर बाजारात आणून खऱ्या नोटांमध्ये बदलून बनावट नोटा बाजारात आणल्या जायच्या. मुंबई गुन्हे शाखेने ७आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.