मुंबई - राज्यातील कोरोनाचा पहिला बळी कस्तुरबा रुग्णालयात गेल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्ती 64 वर्षांची होती. हा देशातील तिसरा बळी असून राज्यात अन्य 38 जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. या सर्वांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच संबंधित मृताच्या मुलाला व पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात 'कोरोना'चा पहिला बळी; ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नी आणि मुलालाही लागण - covid 19 in mumbai
राज्यातील पहिला कोरोनाचा बळी कस्तुरबा रूग्णालयात गेल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्ण 64 वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वी दुबईहून भारतात आला होता.
हिंदुजा रुग्णालयात टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कस्तुरबा रुग्णालयातील मृत पावलेल्या या वक्तीच्या संपर्कात ८ लोक होते, असे सूत्रांकडून समजते. यापूर्वी दिल्लीच्या ६८ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणारी ती दुसरी व्यक्ती होती. त्याआधी कर्नाटकच्या कलबुर्गी येथील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. २९ फेब्रुवारी रोजी ते सौदी अरेबियातून परतले होते.