महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकदिवसीय उच्चांक! राज्यात ६ हजार ३३० कोरोनाबाधितांची नोंद तर, १२५ रुग्णांचा मृत्यू - कोरोना न्यूज महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यभरात आज (गुरुवार) ६,३३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,८६,६२६ वर पोहचली आहे. राज्यात आज १२५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत ८१७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jul 2, 2020, 10:55 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (गुरुवार) एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक ६,३३० रुग्णांची नोंद झाली. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार ६२६ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ७७ हजार २६० कोरोना रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज तबब्ल ८०१८ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांचा आकडा १० लाखाच्या पार गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज (गुरुवार) घरी सोडण्यात आलेल्या ८०१८ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये मुंबई मंडळातील ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळातील ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

हेही वाचा -मुंबईत 1 हजार 554 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, 57 मृत्यू

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खासगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७२ हजार ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज (गुरुवार) १२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यूमागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३८ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे मुंबई मनपा-५७, ठाणे-१, ठाणे मनपा-४, जळगाव-६, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,कोल्हापूर-१, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-९, जालना-२, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

हेही वाचा -कारागृह प्रशासनांनी 'आयसीएमआर'च्या गाईडलाईनचे पालन करावे : मुंबई उच्च न्यायालय

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांचा तपशील :

  • मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण - (८०,६९९), बरे झालेले रुग्ण- (५०,६९१), मृत्यू- (४६८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२५,३११)
  • ठाणे: कोरोनाबाधित रुग्ण - (४१,३४९), बरे झालेले रुग्ण- (१६,६६३), मृत्यू- (१०२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२३,८८०)
  • पालघर: कोरोनाबाधित रुग्ण - (६४२७), बरे झालेले रुग्ण- (२७९६), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३५२०)
  • रायगड: कोरोनाबाधित रुग्ण - (४८८१), बरे झालेले रुग्ण- (२३५५), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२४२२)
  • रत्नागिरी: कोरोनाबाधित रुग्ण - (६३०), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१५७)
  • सिंधुदुर्ग: कोरोनाबाधित रुग्ण - (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (६२)
  • पुणे: कोरोनाबाधित रुग्ण - (२४,४३२), बरे झालेले रुग्ण- (११,९८५), मृत्यू- (८०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (११,६४०)
  • सातारा: कोरोनाबाधित रुग्ण - (११७५), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३८३)
  • सांगली: कोरोनाबाधित रुग्ण - (४११), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१६६)
  • कोल्हापूर: कोरोनाबाधित रुग्ण - (८७४), बरे झालेले रुग्ण- (७२२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१४०)
  • सोलापूर: कोरोनाबाधित रुग्ण - (२६७४), बरे झालेले रुग्ण- (१५८७), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (८१८)
  • नाशिक: कोरोनाबाधित रुग्ण - (४५३०), बरे झालेले रुग्ण- (२४५८), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१८५०)
  • अहमदनगर: कोरोनाबाधित रुग्ण - (४५०), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१३०)
  • जळगाव: कोरोनाबाधित रुग्ण - (३६४७), बरे झालेले रुग्ण- (२१०८), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१२८४)
  • नंदूरबार: कोरोनाबाधित रुग्ण - (१७८), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (९७)
  • धुळे: कोरोनाबाधित रुग्ण - (११७२), बरे झालेले रुग्ण- (६५७), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (४५७)
  • औरंगाबाद: कोरोनाबाधित रुग्ण - (५८४६), बरे झालेले रुग्ण- (२५३७), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३०३८)
  • जालना: कोरोनाबाधित रुग्ण - (६१३), बरे झालेले रुग्ण- (३५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२३९)
  • बीड: कोरोनाबाधित रुग्ण - (१२१), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२३)
  • लातूर: कोरोनाबाधित रुग्ण - (३८३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण- (१६५)
  • परभणी: कोरोनाबाधित रुग्ण - (१०५), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२२)
  • हिंगोली: कोरोनाबाधित रुग्ण - (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (२६)
  • नांदेड: कोरोनाबाधित रुग्ण - (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (११६)
  • उस्मानाबाद: कोरोनाबाधित रुग्ण- (२२९), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (४३)
  • अमरावती: कोरोनाबाधित रुग्ण - (६११), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१५८)
  • अकोला: कोरोनाबाधित रुग्ण - (१५५९), बरे झालेले रुग्ण- (१०८९), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३८९)
  • वाशिम: कोरोनाबाधित रुग्ण - (१११), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३१)
  • बुलढाणा: कोरोनाबाधित रुग्ण - (२६३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (९८)
  • यवतमाळ: कोरोनाबाधित रुग्ण - (३०९), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (७८)
  • नागपूर: कोरोनाबाधित रुग्ण - (१५८२), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३३९)
  • वर्धा: कोरोनाबाधित रुग्ण - (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (३)
  • भंडारा: कोरोनाबाधित रुग्ण - (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (१२)
  • गोंदिया: कोरोनाबाधित रुग्ण - (१४५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (४०)
  • चंद्रपूर: कोरोनाबाधित रुग्ण - (९७), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (४०)
  • गडचिरोली: कोरोनाबाधित रुग्ण - (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (९)
  • इतर राज्ये: कोरोनाबाधित रुग्ण - (९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - (७४)

एकूण : कोरोनाबाधित रुग्ण - १ लाख ८६ हजार ६२६, बरे झालेले कोरोना रुग्ण - १ लाख ०१ हजार १७२, कोरोनामुळे झालेले मृत्यू - ८ हजार १७८, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - १६, ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण - ७७ हजार २६०

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष मुलाखत : "आँख्या का काजल" फेम सपना चौधरीची 'स्ट्रगल स्टोरी'..

टीप - आज (गुरुवार) राज्यात एकूण नोंदवलेल्या १२५ मृत्यूंपैकी ११० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १५ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील १, नवी मुंबई -१, जळगाव – ४, पुणे -३, सातारा -३, औरंगाबाद -२ आणि बुलढाणा -१ यांचा समावेश आहे. हे १५ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखवता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील रुग्णांचे रिकॉन्सिसिलेशन झाल्याने एकूण रुग्ण संख्येत २ चा फरक पडला आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय.सी.एम.आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details