महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात ६ हजार १९० नवीन कोरोना रुग्णांची वाढ; १२७ मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

आज राज्यात ६ हजार १९० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
कोरोना

By

Published : Oct 30, 2020, 8:37 PM IST

मुंबई - आज राज्यात ६ हजार १९० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ३ हजार ५० कोरोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा -'मालमत्ता गहाण ठेवण्यापेक्षा एसटी महामंडळाला सरकारने मदत करावी'

आतापर्यंत राज्यात एकूण ४३ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६ हजार ८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७२ हजार ८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २९ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १२ हजार ४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख २५ हजार ४१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या जवळ

राज्यातील कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. तर, कोरोना मृतांची संख्याही घटली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातच ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details