मुंबई -कोरोनाच्या ( Maharashtra Corona ) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ उतार दिसून येत आहेत. आज (गुरुवारी) 6 हजार रुग्ण ( 6000 Corona Patients Found Today ) आढळून आले असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या 45 इतकी आहे. बुधवारी 7 हजार रुग्ण तर 92 जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांपासून ओमयक्रॉनचे 121 रुग्ण सापडल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनाचा बुधवारी आलेख वाढला होता. सुमारे 7 हजार 142 नव्या रुग्ण आढळून आले होते. आज (गुरुवारी) 6 हजार 248 रुग्ण सापडले असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृत्यूदर 1.83 टक्के इतके स्थिर स्थावर आहे. 18 हजार 942 इतके रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 76 लाख 12 हजार 233 इतकी आहे. हे प्रमाण 97.22 टक्के इतके आहे. 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.30 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 29 हजार 633 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2368 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 70 हजार 150 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे 121 रुग्ण