मुंबई : दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ( Bandra West Public Ganeshotsav Mandal Mumbai ) या वर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ( Replica of Pashupatinath Temple ) ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. पशुपतिनाथ हे भगवान महादेवाचे नेपाळमधील प्राचीन मंदिर आहे.
यंदा मंडळाचे हे २७ वे वर्ष - जागतिक वारसा लाभलेल्या वास्तूंपैकी एक असलेल्या या मंदिराची वास्तुरचना पॅगोडा पद्धतीची आहे. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आणि गाभाराही हुबेहूब साकारला आहे. या मंडळाचे हे २७ वे वर्ष असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार त्याचे प्रमुख सल्लागार आहेत.