मुंबई - कोरोनाच्या विविध समस्यांसंदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीनं काळ्या बुरशीसंदर्भात राज्यातील परिस्थितीचा अहवाल न्यायालयापुढे सादर केला. त्यात 28 मेपर्यंत राज्यात 5126 लोकांना म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली. राज्यात सध्या 42 सरकारी, तर 419 खासगी रुग्णालयात म्यूकरमायकोसिसचे उपचार सुरू असल्याचे राज्य सरकारने सांगितले.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीत मराठा समाजावर फोकस नाही; मराठा कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
म्यूकरमायकोसिसवरील औषध 'अँम्पोटेरेसिन-बी'चे 91 हजार 470 डोस आजवर महाराष्ट्रात देण्यात आले, अशी आकडेवारी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. केंद्र सरकारकडे यावरील औषधांच्या 19 ऑर्डर दिल्या आहेत. हाफकिनकडूनं 10 जूनपर्यंत औषधांचे 40 हजार डोस राज्यासाठी वितरीत केले जातीलं, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला.
- या शहरात रुग्ण जास्त -