मुंबई -जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रोज शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 510 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 हजार 123 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 18 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत आतापर्यंत 361 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतून आतापर्यंत 1908 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत 24 तासात कोरोना विषाणूचे 510 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 मृतांपैकी 10 जणांना दिर्घकालीन आजार होते. तर 3 जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. 18 मृतांमध्ये 14 पुरुष तर 4 महिला होत्या. मृतांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 9 जणांचे वय 60 च्या वर होते तर 7 जणांचे वय 40 ते 60 दरम्यान होते.
खाटांची संख्या वाढवणार -
मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने तीव्र आजाराच्या रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून कोरोना रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या 3 हजार खाटा असून नायर, केईएम, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल मध्ये खाटांची संख्या वाढवून 4500 पर्यंत वाढवली जाणार आहे.
जेष्ठ नागरिकांची स्क्रिनिंग -