मुंबई - मुंबईत शनिवारी 50 हजार 725 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजतागायत एकूण 19 लाख 41 हजार 878 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत संचारबंदी असताना 50 हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. यावेळी मुंबईत संचारबंदी दिसत नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आजतागायत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
हेही वाचा-विशेष : जीभ पांढरी झालीय, जिभेला सूज आलीय? दुर्लक्ष करू नका, हा असू शकतो 'कोविड टंग'!
शनिवारी लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 50 हजार 725 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 37 हजार 585 लाभार्थ्यांना पहिला तर 13 हजार 140 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 19 लाख 41 हजार 878 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 लाख 97 हजार 243 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 44 हजार 635 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 150 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 95 हजार 760 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 48 हजार 431 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 32 हजार 537 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा-नागपुरात 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित; 79 जणांचा मृत्यू
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 28 हजार 149 तर आतापर्यंत 12 लाख 49 हजार 556 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 400 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 39 हजार 422 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी 17 हजार 176 लाभार्थ्यांना तर आजपर्यंत एकूण 5 लाख 52 हजार 900 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,65,150
फ्रंटलाईन वर्कर - 2,95,760
ज्येष्ठ नागरिक - 7,48,431
45 ते 59 वय - 6,32,537
एकूण - 19,41,878