महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Electricity Issue : मुंबईतील विज पुरवठा खंडीत; 50 लोकल ट्रेन रद्द - मुंबई लोकल रेल्वे रद्द

मुंबईच्या काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला ( Mumbai Electricity Issue ) होता. त्याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. उपनगर भागातील 50 लोकल रेल्वे रद्द झाल्या ( Electricity Issue Local Train Cancelled ) आहेत.

local train
local train

By

Published : Feb 27, 2022, 7:04 PM IST

मुंबई - महावितरणच्या मुलुंड-ट्रॉम्बेमधील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन आज ( रविवारी ) सकाळी ट्रिप झाली होती. मुंबईच्या बहुतांश परिसरातील वीज पुरवठा काही कालावधीसाठी खंडित झाला ( Mumbai Electricity Issue ) होता. परिणामी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आणि लांबपल्यांच्या गाड्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे 50 उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आणि 140 गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली ( Electricity Issue Local Train Cancelled ) आहे. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गावर जास्त परिणाम झालेला नाही.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ( रविवार ) सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी टाटा पॉवर कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे, चर्चगेट आणि अंधेरी दरम्यान लोकल ट्रेनची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. अंतरिम उपाय म्हणून जोगेश्वरी सबस्टेशनवरून विद्युत पुरवठा वाढविण्यात आला होता. त्यानंतर 10 वाजून 44 मिनिटांनी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. टाटा पॉवर कंपनीचा विद्युत पुरवठा देखील 10 वाजून 53 मिनिटांनी पूर्ववत झाला. मात्र, अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील ५० लोकल फेऱ्या रद्द झाल्या असून, 140 लोकल ट्रेन उशिराने धावल्या. याशिवाय लांबपल्याचा रेल्वे गाडयांना सुद्धा लेट मार्क लागलेला आहे. मुंबईला येणारी ट्रेन क्रमांक १२९५४ ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस ही मुंबई सेंट्रल टर्मीनस वर अर्धा तास उशिरा पोहचली आहे.

कळवा ते ट्रॉम्बे या MSETCL ट्रान्समिशन लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात व्होल्टेज कमी-जास्त झाले होते. त्यामुळे ट्रॉम्बे सालसेट-1 ओव्हरलोडवर ट्रिप झाला. परिणामी दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाला. तर भिरा हायड्रो प्लांटमध्ये बिघाड झाला आहे. तर आता टाटा पॉवरने वीज पूर्ववत सुरु केली आहे. तसेच, या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहेत.

हेही वाचा -मोदी सरकार लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार - भाजप नेते आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details