मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मद्यावरील मुल्यवर्धित करात (व्हॅट) ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मद्य महागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमधून घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्याचे एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे.
हेही वाचा-दुचाकी अन् सिलेंडरला फासावर लटकवत श्राद्ध घालून दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन