मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. गेले दोन दिवस 2 हजार 600 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आज (सोमवारी) घट होऊन रविवार 4 ऑक्टोबरला 2 हजार 026 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची ही नोंद आहे. आज (सोमवारी) 26 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 5 हजार 389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
33 हजार 637 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2026 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 62 हजार 514 वर पोहचला आहे. तर आज 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 207 वर पोहचला आहे. आज 5 हजार 389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 86 हजार 059 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 93 लाख 37 हजार 713 नमुन्यांपैकी 65 लाख 62 हजार 514 नमुने म्हणजेच 11.06 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 40 हजार 088 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -