मुंबई - राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्या घटली असताना, आज किंचित वाढ ( Maharashtra corona update ) झाल्याचे दिसून येत आहे. काल 225 रुग्ण सापडले होते. आज 235 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रीय रुग्ण देखील आटोक्यात असून आज 3 हजार 209 इतके आहेत. तर, दुसरीकडे ओमायक्रोनचा आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -BMC : रस्ते पदपथांवर डेब्रिज टाकणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार करा - पालिका आयुक्तांचे निर्देश
राज्यात कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहेत. आज 460 नव्या बाधितांची नोंद झाली, तर सोमवारी 225 जणांना संसर्गाची बाधा झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के असून, दिवसभरात 71 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
कोविडच्या निदानासाठी आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 चाचण्या केल्या. त्यापैकी 10.04 टक्के इतके म्हणजेच, 78 लाख 69 हजार 498 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 3 हजार 209 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.