मुंबई - राज्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी रुग्ण संख्येत चढ उतार होताना दिसून येत आहेत. आज दिवसभरात 452 बाधितांची नोंद झाली. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी 359 रुग्ण आणि शून्य मृत्यूची नोंद झाली होती. सक्रिय रूग्ण 2 हजार 963 इतके असून बरे होण्याचे प्रमाण 98.9 इतके आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा आजही शून्य रुग्णांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हणणे ( Maharashtra Corona Update ) आहे.
रुग्ण संख्येचा आलेख कमी जास्त
राज्यात कोरोना उतरणीला लागला असला तरी रुग्ण संख्येचा आलेख कमी जास्त होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले असून, त्यात 93 रुग्णांची आज भर पडली आहे. गुरुवारी 359 रुग्ण सापडले होते. काल तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज 4 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.9 टक्के असून दिवसभरात 494 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 19 हजार 594 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.