मुंबई - राज्यात आज सुमारे 44 हजार 388 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे ( Maharashtra Corona Update ). त्यापैकी 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 19 हजार 474 रुग्ण सापडले. शनिवारी 20 हजार रुग्ण आढळून आले होते. तर, राज्यात 2 लाख रुग्ण सक्रिय आहेत. दुसरीकडे आज ओमायक्रॉनच्या रुग्णांनी 200 चा टप्पा पार केला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -उद्यापासून आरोग्य फ्रंटलाईन कर्मचारी, वयोवृद्धांना बूस्टर डोस; मुंबई महानगरपालिका सज्ज
राज्यात दोन दिवसांत कोरोनाचे भरमसाठ रुग्ण वाढले आहेत. आज 44 हजार 388 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या 69 लाख 20 हजार 44 इतकी झाली आहे. तर, 15 हजार 351 रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 72 हजार 432 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.98 टक्के इतका आहे. दिवसभरात 12 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.4 टक्के इतका आहे.
रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 5 लाख 45 हजार 105 चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या 10 लाख 46 हजार 996 व्यक्ती होम क्वारंटाईन तर 2 हजार 614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 2 हजार 259 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे आतापर्यंत 1 हजार 216 रुग्ण
राज्यात आज ओमायक्रॉनचे 207 रुग्ण आढळून आले. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने 155 तर, राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार 52 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे ओमायक्रॉनचे 1 हजार 216 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. सर्वाधिक 56 रुग्ण सांगली तर, 40 रुग्ण मुंबईत आढळून आले. पुण्यात 22, नागपुरात 21, पिंपरी - चिंचवड 15, ठाणे मनपा 12, कोल्हापूर 8, अमरावती 6, उस्मानाबाद 5, बुलडाणा आणि अकोला प्रत्येकी 4, गोंदिया 3, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली प्रत्येकी 2, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.