मुंबई - पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. २४ ते ३१ जुलै या आठवडाभरात मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. ( new cases of swine flu in Mumbai ) त्याचप्रमाणे मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ आजारांच्या रुग्ण संख्येतही वाढ झाल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
साथीच्या आजारात दुप्पट वाढ -मुंबईमध्ये १ ते २४ जुलै दरम्यान मलेरियाचे ३९७ रुग्ण, गॅस्ट्रोचे ५२४ रुग्ण, लेप्टो ३४, तर डेंग्यूच्या ५० रुग्णांची नोंद झाली होती. मात्र २४ ते ३१ जुलै या एका आठवड्यात मलेरियाच्या ५६३, गॅस्ट्रो ६७९, स्वाईन फ्ल्यू १०५, लेप्टो ६५ तर डेंग्यूच्या ६१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे.