महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 16, 2022, 6:07 PM IST

ETV Bharat / city

PM Narendra Modi birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ४१५ मोफत आरोग्य शिबिरे ; जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आशिष शेलारांचे आवाहन

१६ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात ४१५ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या शनिवारी करण्यात आले (occasion of PM Narendra Modi birthday) आहे. तरी नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले (415 free health camps organized in Mumbai) आहे.

Mumbai BJP President Ashish Shelar
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार

मुंबई - १६ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचंऔचित्य साधून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात ४१५ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या शनिवारी करण्यात आले (occasion of PM Narendra Modi birthday) आहे. तरी नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) यांनी केले (415 free health camps organized in Mumbai) आहे.


पंतप्रधानांचा वाढदिवस - विविधतेत एकतायानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर जाऊन 'सेवा पंधरवडा' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, मन की बात कार्यक्रम, महापुरुषांच्या पुतळ्यांची सफाई, बूस्टर डोस, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, मोफत धान्य वाटप, बुद्धीजीवी संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनानावरील प्रदर्शनी अश्या उपक्रमांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘विविधतेत एकता’ म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येत (free health camps occasion of PM Modi birthday) आहे.

मागील वर्षी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने झाले होते लसीकरणमिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात 21 जून रोजी 88.09 लाख आणि 27 ऑगस्ट रोजी 1.03 कोटी विक्रमी लसीकरणाचा पल्ला गाठण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य ठेवले होते. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी 20 दिवसांचा मेगा इव्हेंटही आयोजित केले होते. या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले होते. ती मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत चालली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा लसीकरण मोहीम सुरू होती. यावेळी वाढदिवसाच्या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात 1 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या होत्या. एक लाखांहून अधिक ठिकाणी लस दिली जात आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरेही घेण्यात येत होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले होते की, चला लस सेवा करूया, ज्यांनी लसीचा डोस घेतला नाही, ते घ्या आणि त्याला मोदींच्या वाढदिवसाची भेट द्या.

यावर्षीदेखील आता आरोग्य शिबीर मोहीम राबविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details