मुंबई -राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Assembly session 2022 ) नुकतेच पार पडले. राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले आहेत. असे असले तरी वाया गेलेल्या कामकाजामुळे २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार ( Maharashtra budget session ) पडले आहे. ३ मार्च ते २५ मार्च २०२२ या कालावधीत मुंबईत पार पडलेल्या या अधिवेशनात फार अडथळे न येता कामकाज बऱ्यापैकी झाले. मात्र तरीही या अधिवेशनात वाया गेलेल्या कामकाजाच्या तासात मुळे सुमारे २ कोटी ८८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ( 2 crore 88 lakh rupees wasted ) अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी ( senior political analyst Vivek Bhavsar ) व्यक्त केला आहे.
हेही वाचा-Free Ration For Three Months : मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय.. १५ कोटी लोकांना ३ महिने मोफत रेशन
विधीमंडळात ४१० दहा मिनिटे वाया
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते २५ मार्च दरम्यान झाले. मात्र, या अधिवेशनात विधानसभेत एकूण झालेल्या बैठकीची संख्या पंधरा आहे. प्रत्यक्षात कामकाज १०६ तास ३० मिनिटे इतके झाले. रोजचे सरासरी काम सात तास दहा मिनिटे इतके झाले. सभागृह कधीकधी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवून कामकाज करण्यात आले. कधी सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, असे असले तरी विरोधकांनी कामकाजात घातलेला गोंधळ आणि अन्य कारणांमुळे सभागृहाचा वेळ ६ तास ५० मिनिटे इतका वाया गेला. अधिवेशनाच्या कामकाजाचा दरम्यान येणारा खर्च पाहता प्रत्येक मिनिटाचा खर्च हा ७० हजार रुपये इतका असतो. एकूण कामकाजाची ४१० दहा मिनिटे वाया गेली. त्यानुसार राज्यातील जनतेच्या २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा झाला हे नक्की, असेही भावसार यांनी सांगितले.